इरफान, ऋषी कपूर कॅन्सर गेलेच, मात्र या अभिनेत्यांना सुद्धा कॅन्सरने गमवावा लागला होता जीव

बॉलीवुड आणि आजार हे समीकरण तसे फार जुने आहे. जुन्या काळात देखील अनेक कलाकारांना विविध आजार होऊन त्यांचा मृत्यू घडवलेला आहे आणि त्यांना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या होत्या. रोजचे काम इतर सवई आणि असलेली व्यसन यासाठी कारणीभूत असल्याचे देखील सांगण्यात येते.
बॉलिवूड अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांचे नुकतेच त्यांच्यासारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. इरफान खान यांना न्यूरोईडोक्राईन हा कॅन्सर होता. तर ऋषी कपूर यांना लूकोमिनिया या आजाराने ग्रासले होते. याआधी देखील अनेक कलाकारांचा कॅन्सर सारख्या आजाराने मृत्यू झाला आहे.
आपण या लेखांमध्ये असे कोणते अभिनेते होते की, ज्यांना कॅन्सरने ग्रासले होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला त्याबाबत माहिती घेऊया.
2. नर्गिस : जुन्या काळातील अतिशय गुणी कलावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्या काळात महिला चित्रपटात काम करण्यास धजावत नव्हत्या त्या काळात त्यांनी अनेक बोल्ड सीन्स देऊन सर्वांना चकित केले होते. राजकपूर यांच्यासोबतच्या श्री 420 या चित्रपटातील त्यांचे प्यार हुआ इकरार हुआ हे गीत प्रचंड गाजले होते. त्यांना पॅनक्रियाटिक या कॅन्सरने ग्रासले होते. 1981 मध्ये त्यांचे निधन झाले.
3.राजेश खन्ना : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार असे बिरूद राजेश खन्ना यांचा नावामागे होते. राजेश खन्ना यांचा एक चित्रपट किमान पंचवीस आठवडे चालायचा. त्यामुळे त्यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून दर्जा मिळाला होता.
राजेश खन्ना त्यांना दारूचे व्यसन जडले होते. शेवटी शेवटी त्यांनी दारू पिणे चालू ठेवले की त्यांना काहीही समजत नव्हते. 2012 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
4: फिरोज खान : बॉलिवूडमधील अतिशय डॅशिंग असा अभिनेता यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या होत्या. त्यांच्या विशिष्ट पेहरावासाठी ते बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध होते. काही वर्षापूर्वी आलेल्या वेलकम या चित्रपटात त्यांनी अतिशय चांगली भूमिका केली होती. त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला होता. 2009 मध्ये कॅन्सरने त्यांचे देखील निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा फरदीन खान आहे.
5: सिंपल कपाडिया : सिंपल कपाडिया ही अभिनेत्री डिंपल कपाडियाची बहिण आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले असून काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर आजाराने घेरले होते. अनेक वर्षे उपचार केल्यानंतर 2009 मध्ये तिचा मृत्यू झाला होता.
सोनाली बेंद्रेची मात
बॉलीवूड मध्ये नाव कमावणाऱ्या मराठमोळ्या सोनाली बेंद्रे हिला देखील काही वर्षांपूर्वी कॅन्सर आजाराने ग्रासले होते. मात्र, त्याचे निदान झाल्याने तिने परदेशात जाऊन उपचार केले. यासाठी तिला आपले केस देखील गमवावे लागले.
मात्र, सध्या आवश्यक ती काळजी घेत असून तिची प्रकृती आता चांगली आहे एक प्रकारे सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या आजारावर मात केल्याचे दिसते.