या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफला विकाव्या लागल्या होत्या घरच्या वस्तू, टायगरनेच केला खुलासा….

या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफला विकाव्या लागल्या होत्या घरच्या वस्तू, टायगरनेच केला खुलासा….

हिरोपंती चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यु करणाऱ्या टायगर श्रॉफबद्दल नवीन सांगायची काही गरज नाही. आता टायगर श्रॉफ बॉलिवुडचा ॲक्शन हिरो म्हणूनही ओळखला जातो. खूप कमी काळात टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आणि लाखो मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टायगर बॉलिवूडमध्ये पुढे आला आहे.

एकेकाळी कॅटरिना कैफची मुख्य भूमिका असलेल्या ‘बुम’ या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली होती आणि हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला आणि यामुळे जॉकी श्रॉफ यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती’ असे टायगर श्रॉफ ने एका मुलाखतीत सांगितले.

मी लहानाचा मोठा होईपर्यंत ज्या वस्तू मी पाहिल्या ज्या वस्तूंसोबत मी मोठा झालो त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घरातून एक एक करून विकल्या जात होत्या. तो काळ आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, त्यावेळी मी अकरा वर्षाचा होतो आणि घरात काय सुरू आहे मला कळत देखील नव्हते.

2003 मध्ये भूम चित्रपट प्रदर्शित झाला होता कैजाद गुस्ताद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर, कॅटरिना कैफ, जॅकी श्रॉफ, जीनत अमान आणि जावेद जाफरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आणि याच चित्रपटातून कॅटरिना कैफने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. दरम्यान, प्रदर्शित होण्याच्या आधीच चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यामुळे याचा फटका चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला आणि यामुळेच जॅकी श्रॉफ यांच्या परिवाराची बिकट परिस्थिती झाली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *