फक्त ‘या’ एका व्यक्तीमुळे ‘श्वेता बच्चन’ बनू शकली नाही अभिनेत्री.!

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक बीग बी अमिताभ बच्चन. तसं बघितले तर बच्चन कुटुंबातील प्रत्येक सदस्य अभिनय क्षेत्राशी जोडला गेला आहे. मात्र एक सदस्य जो नेहमीच या झगमगत्या दुनियेपासून लांबच राहिला. तो सदस्य आहे अमिताभ आणि जया यांची लेक श्वेता बच्चन.
सारेच अभिनयासह जोडले असताना श्वेता मात्र नेहमीच या क्षेत्रासापासून दूर राहिली. मुळात श्वेतालाही इतरांप्रमाणे अभिनयक्षेत्रात करिअर घडवायचे होते. मात्र अमिताभ यांचा या गोष्टीसाठी विरोध होता.
त्यामुळे या चित्रपटसृष्टीचा भाग असूनही ती प्रसिद्धीपासून कायमच दूर असते अशा चर्चा नेहमीच रंगतात मात्र अमिताभ यांनी कधीच मुलांना कोणतीही गोष्ट करण्यापासून अडवले नाही. मग करिअरसाठी का अडवेन असे खुद्द अमिताभ यांनीच सांगितले होते.
श्वेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे विविध फोटोंच्यामाध्यमातून तिच्या आयुष्यातील घडामोडी सा-यांनाच माहिती असतात. मात्र एक गोष्ट आहे जी आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. श्वेता नंदाचा देखील पती निखिल नंदासह घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून श्वेताही बच्चन कुटुबियांसोबत राहत आहे.
तब्बल लग्नाच्या २२ वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटाचे नेमके कारण समोर आले नसले तरी हे दोघे सध्या वेगळे राहत आहेत. तसेच श्वेताने इस्टाग्रामवर देखील नंदा आडनाव काढत केवळ श्वेता बच्चन ठेवले आहे.
आता दिल्ली सोडून श्वेताने थेट मुंबई गाठत आई-वडिलांसह राहणे पसंत केले आहे. श्वेता आणि निखिल नंदा यांना दोन मुलं आहेत. मुलगी नव्या नवेली आणि अगस्त्य असे त्यांच्या मुलांची नावं आहेत.