रितेश-जेनेलियात आहे वयाचे ‘एवढे’ अंतर.. नंबर 6 च्या जोडीत आहे ’22’ वर्षाचे अंतर…

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी आपल्या वयापेक्षा लहान किंवा मोठ्या जोडीदारासोबत लग्न केले आहे. यात काही कलाकारांच्या वयाचे अंतर १४ वर्ष ते २२ वर्षापर्यंत आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची वय किती हे जाणून घ्यायला सर्वांनाच खूप आवडते. त्यामुळे आम्ही आपल्याला आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल माहिती तर देणारच आहोत. मात्र,कलाकारांच्या जोडीदारामध्ये एकमेकांत किती अंतर आहे, हे आम्ही आपल्याला या लेखात सांगणार आहोत..
1.सोहा अली खान-कुणाल खेमू : सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले आहे. या दोघांना एक मुलगी आहे. सोहा कुणालपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. सोहाचे वय सध्या ४१ वर्ष आहे, तर कुणाल सध्या ३६ वर्षाचा आहे.
३. रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख: बॉलिवूडची ही अतिशय चुलबुली जोडी. या जोडीची सर्वत्र चर्चा असते. रितेश आणि जेनेलिया हे एकमेकांसाठीच बनले आहेत. याचा प्रत्यय अनेकदा येतो. ही जोडी तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत. रितेश आणि जेनेलिया यांच्या वयात ९ वर्षाचे अंतर आहे रितेश सध्या ४१ वर्षाचा आहे तर जेनेलिया ३२ वर्षाची आहे.
४. आमिर खान-किरण राव : आमिर खान याने काही वर्षांपूर्वी किरण रावसोबत दुसरे लग्न केले. या दोघांमध्ये ९ वर्षाचे अंतर असून आमीर खान हा ५५ वर्षांचा आहे. तर किरण राव ही ४६ वर्षांची आहे.
५. अजय देवगन-काजोल देवगन: काही वर्षांपूर्वी अजय देवगन आणि काजोल यांनी अनेक चित्रपटातून एकत्र काम केले आहे. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांना दोन मुले आहेत. सध्या काजोल ४५ वर्षाची आहे, तर अजय देवगन हा ५१ वर्षाचा असून या दोघांमध्ये ६ वर्षांचे अंतर आहे.
६. दिलीप कुमार-सायराबानो: बॉलीवूडमधील ही एक दिग्गज जोडी म्हणावी लागेल. गेल्या काही वर्षांपासून दिलीपकुमार हे आजारी असून सायराबानो त्यांची विशेष काळजी घेत आहेत.दिलीप कुमार यांचे वय ९७ वर्ष आहे तर त्यांच्या पत्नी सायरा यांचे वय ७५ वर्षे आहे. या दोघांमध्ये तब्बल २२ वर्षांचे अंतर आहे.
७. असिन-राहुल शर्मा: काही वर्षांपूर्वी आमीर खान याच्यासोबत गजनी या चित्रपटातून तिने धमाकेदार काम केले होते. त्यानंतर तिने सलमान खानसोबत देखील काही चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने राहुल शर्मा यांच्यासोबत लग्न केले. या दोघांमध्ये ७ वर्षांचे अंतर आहे. असीन ३४ वर्षांची आहे, तर तिचा पती राहूल हा ४१ वर्षाचा आहे.