..म्हणून 16 कोटी खर्च करूनही झाला वेदिका शिंदे हिचा मृ’त्यू; वडिलांनी केले ‘हे’ आव्हान…

..म्हणून 16 कोटी खर्च करूनही झाला वेदिका शिंदे हिचा मृ’त्यू; वडिलांनी केले ‘हे’ आव्हान…

मागील काही महिन्यांपासून तुम्ही वैदिका शिंदेचे नाव ऐकले असेल. ११ महिन्यांच्या या चिमुकली एका आजराशी झुंज देत होती. तिच्या उपचारासाठी १६ कोटीच्या इंजेक्शनची गरज होती त्यामुळे तिचे वडील सौरव शिंदे यांनी सोशल मीडियाची मदत घेत क्राउड फुंडींगच्या मदतीने १६ कोटी उभे केले.

दरम्यान, स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA) आ’जाराशी लढणाऱ्या ११ महिन्यांच्या वेदिका शिंदेचं १ ऑगस्ट रोजी नि’धन झालं. दीड महिन्यांपूर्वीच वेदिकाला उपचारासाठी आवश्यक असलेलं १६ कोटी रुपयांचे इं’जेक्शन देण्यात आलं होतं. इं’जेक्शन दिल्यानंतर तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती.

तसेच अनेक मराठी कलाकारांनी देखील मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. १६ कोटी लोकवर्गणीतून जमा झाली. इं’जेक्शन भारतात आले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजे’क्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती. सगळे व्यवस्थित सुरू आहे असे वाटत असतानाच आज काळाने वेदीकवर झ’डप घातली.

मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा निरोप घेतला. रविवारी संध्याकाळी वेदिकाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिची मृ’त्यूशी झुं’ज अप’यशी ठरली.

छातीमध्ये दूध गेल्यामुळे वेदिकाचा मृ’त्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, मुलगी गेल्याचं दु:ख असतानाही वेदिकाच्या वडिलांनी सामाजिक बांधिकली जपल्याचं पाहायला मिळत आहे. वेदिकाचा मृ’त्यू इंजे’क्शन दिल्यानंतरही कसा झाला, असा चुकीचा प्रश्न उपस्थित करु नका, असं आवाहन वेदिकाचे वडिल सौरव शिंदे यांनी केलं आहे.

क्राऊड फंडींगच्या माध्यमातून उभारला होता पैसा- सुरुवातीच्या टप्प्यापासून मिलापच्या ह्या फंडरेझर अभियानाला मीडियाने उचलून धरले व प्रसिद्धी दिली. पहिल्या आठवड्यामध्ये सुमारे १ कोटी इतका निधी उभा झाला. मिलापवर ह्याच हेतुसाठी सुमारे ५० अन्य मदत करणारे अभियानसुद्धा चालवले गेले.

बरखा सिंह, मास्टर शेफ शिप्रा खन्ना असे सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्ती आणि अनुप्रिया खेर असे पालकांवर प्रभाव असलेले व्यक्ती आणि इतर अनेकांनी सहाय्य करून ह्या मोहिमेला बळकटी दिली. सोशल मीडीयावर आपल्या हँडल्स द्वारे आपल्या चाहत्यांना विनंती करून ह्यासाठी मदत करायला बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता जॉन अब्राहमही समोर आला होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *