‘या’ मराठी कलाकारांच्या कुटुंबातील करोना योद्धे; जीवाची पर्वा न करता देतायत लढा

‘या’ मराठी कलाकारांच्या कुटुंबातील करोना योद्धे; जीवाची पर्वा न करता देतायत लढा

देशांमध्ये तसेच जगभरात सध्या कोरोना विषाणूने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेसह इटली, ब्राझील, तुर्की, इराण, स्पेन यासारख्या देशांमध्ये अक्षरशः मृत्यूने तांडव घातले आहे. यावर अजूनही लस सापडलेली नाही. भारतामध्येही नुकताच कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दीड लाखापर्यंत जाऊन पोचला आहे.

सकारात्मक बाब म्हणजे यातील जवळपास ६० हजार रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील बरे होण्याचा दर हा जगाच्या तुलनेत खूप चांगला आहे. तसेच मृत्युदर देखील जास्त नाही. आपली लोकसंख्या एवढी मोठी आहे त्यामानाने बरे होण्याचे प्रमाण देखील चांगलेच आहे.

सेवा देत आहेत

प्राजक्ता माळी : अनेक मराठी मालिकांमधून प्राजक्ता माळी आपल्या दिसलेली आहे. काही चित्रपटात देखील तिने काम केले आहे. प्राजक्ता माळीची मावशी पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत असून तिथे त्या सीनियर नर्स आहेत.

१५ दिवस ड्यूटी केल्यानंतर पंधरा दिवस त्यांना स्वतःला विलग करावं लागतं. यासाठी सरकारने त्यांच्यासाठी वेगळ्या हॉस्टेलची व्यवस्था केली आहे. त्यानंतर 15 दिवसांनी परत त्या ड्युटीवर जातात. प्राजक्ता माळीने नुकताच हा फोटो शेअर केला आहे.

डॉ. अमोल कोल्हे : डॉक्टर अमोल कोल्हे यांचा परिचय सांगायची तुम्हाला तशी गरजच नाही. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांच्यावरील मालिकेत काम करून घराघरात प्रवेश मिळविला आहे. कोल्हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत.

अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी कोल्हे या मुंबईच्या केईएम रुग्णालयात सेवा देत आहेत. सकाळी उठल्यानंतर मुलांना नाष्टा जेवण करून त्या रुग्णालयात दाखल होतात आणि अहोरात्र सेवा करतात.

संजीवनी पाटील : काही महिन्यांपूर्वी आलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेत वच्छीची भूमिका संजीवनी पाटील यांनी साकारली होती. संजीवनी पाटील यांचे पती पोलिस दलात कार्यरत आहेत. सध्या त्यांना एक दिवस देखील सुट्टी नाही. पोलिसांवर होणारे हल्ले झाले की त्यांचे मन अस्वस्थ होते. जे लोक सेवा देतात त्यांच्यावर हल्ले होऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.

अजिंक्य राऊत : विठू माऊली या मालिकेतून सर्वांना दिसलेला अजिंक्य सध्या घरीच आहे. मात्र, अजिंक्य राऊत याची आई परभणी येथील रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. त्या अहोरात्र करून त्यांची सेवा करत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *