तुम्हाला माहित आहे का? टीव्हीवरील ‘रामा’ने या सिनेमात साकारला होता लक्ष्मण

करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पाहिले लॉकडाउन घोषित केल्यानंतर या दरम्यान घरात काय करावे असा प्रश्न सोशल मीडियावर जोर धरत होता.
त्यामुळे दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पौराणिक मालिका रामायण आणि महाभारत यांचे पुन्हा प्रसारण करण्याचे आदेश दिले. आणि तेव्हा पासूनच रामायण मालिका आघाडीवर आहे. पुन्हा एकदा या मालिकेचे प्रसारण सुरू झाल्यामुळे या मालिकेतील सर्व पात्र पुन्हा एकदा जिवंत झाले आहेत.
तसेच, रामायणात प्रभू रामचंद्राचे पात्र साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी पुढे मोठ्या पडद्यावर लक्ष्मणाची भूमिका केली होती हे तुम्हाला माहित आहे का? १९८७ मध्ये रामायण सुरु झालं आणि अरुण गोविल यांची राम ही प्रतिमा प्रत्येकाच्या मनात अगदी ठसली होती. छोट्या पडद्यावरच्या या रामाने १९९७ मध्ये आलेल्या लव-कुश या सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारली होती.
सध्या या सिनेमातील राम-लक्ष्मण म्हणजेच जितेंद्र आणि अरुण गोविल यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट सुमित काडेल यांनीही हा फोटो ट्विट केला आहे.
प्रभू रामचंद्र हे रावणाचा वध करुन अयोध्येला परततात आणि रामराज्य सुरु होतं असा शेवट होऊन रामायण ही मालिका संपली होती. मात्र मालिका संपल्याची हळहळ प्रेक्षकांना वाटू लागली. तेव्हा रामानंद सागर यांनी उत्तर रामायण नावाने पुन्हा ही मालिका सुरु केली.
रामराज्य सुरु होतं त्यानंतर काय काय घडलं होतं? त्या घटना या मालिकेत दाखवण्यात आल्या होत्या. रामायणाएवढीच पसंती उत्तर रामायणालाही मिळाली. रामायण लॉकडाउनच्या काळात सुरु केल्याने ते पुन्हा चर्चेत आहेच.
मात्र असे काही किस्सेही समोर येत आहेत. रामायणात प्रभू रामचंद्र साकारुन ती भूमिका अजरामर करणाऱ्या अरुण गोविल यांनी १९९७ मध्ये आलेल्या लव-कुश सिनेमात मात्र लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. सध्या या सिनेमातील फोटो व्हायरल होतो आहे.