‘या’ एका व्यक्तिमुळे, वयाच्या 42 वर्षांनंतरही ‘भाभीजी’ म्हणजेच शिल्पा शिंदे आजही अविवाहित आहे.!

‘भाभीजी घर पर हे’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली ‘शिल्पा शिंदे’ सद्या छोट्या पडद्यापासून लांब आहे. पण तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ‘भाभीजी घर पर हे’ या मालिकेने शिल्पाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.
शिल्पाने आज जरी मालिका सोडली असली तरी लोक तिला भाभीजी या नावानेच ओळखतात. दरम्यान, शिल्पाच्या मोडलेल्या लग्नाच्या चर्चा देखील ऐकायला मिळतात. शिल्पा 42 वर्षाची असूनही आजही अविवाहित आहे. पन या गोष्टीला एक अभिनेता जबाबदार आहे असं देखील शिल्पा म्हणते. आज आपण त्याच व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
आजही शिल्पा लग्न, कुटुंब आणि जबाबदारी मध्ये न अडकता आज ती स्व: मर्जीने आपले आयुष्य जगत आहे. दरम्यान रोमित राजनेही असे वक्तव्य केले होते की, शिल्पाला नेहमी जीवनातील प्रत्येक गोष्टींपासून पळ काढण्याची सवय आहे. यामुळे तिने तिचे वैयक्तीक आणि व्यावसायिक नुकसान होत आहे असं तो म्हणाला होता.
शिल्पा अविवाहित असण्यामागे आजही फक्त रोमितच जबाबदार आहे असे वारंवार स्पष्ट होत असले तरी याला शिल्पाही तितकीच जबाबदार आहे. कारण टाळी एका हाताने वाजत नाही.