अलिशान गाड्यासह अमृता खानविलकर आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण….. पतीही आहे अभिनेता

अलिशान गाड्यासह अमृता खानविलकर आहे ‘एवढ्या’  कोटींची मालकीण….. पतीही आहे अभिनेता

काही वर्षांपूर्वी मराठीत आलेला ‘नटरंग’ चित्रपट आपल्याला आठवत असेलच. या चित्रपटांने अक्षरशः मराठीसह बॉलीवूडमध्ये देखील धुमाकूळ घालून दिला होता. चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी अतिशय अफलातून आणि दर्जेदार काम केले होते. एक पिळदार शरीरयष्टीचा अभिनेता ते नाच्या अशी त्यांनी भूमिका साकारली होती.

हा चित्रपट मराठीसाठी अतिशय माइलस्टोन ठरला होता. चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई करून मराठीमध्ये नवा ट्रेंड रुजू झाला होता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिने चार चाँद लावले होते. तसेच या चित्रपटात अमृता खानविलकर हिने आता वाजले की बारा या गाण्यावर अतिशय बहारदार नृत्य करून सर्वांची मने जिंकली होती.

त्यानंतर ती मुंबईतच राहत आहे. काही जाहिराती आणि मॉडेलिंग केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यात त्यानंतर तिने काही मालिकादेखील केलेली आहेत. सध्या ती अनेक मालिकांतून आपल्या दिसत असते. हिंदी चित्रपटात देखील तिने काम केले आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, आपल्याला कुछ कुछ होता है हा चित्रपट प्रचंड आवडत असल्याचे तिने सांगितले.

आता अमृता खानविलकर बॉलीवुड आणि मराठी चित्रपट सृष्टीत चांगलीच रुळली आहे. 2015 मध्ये तिने हिमांशू मल्होत्रा याच्यासोबत लग्न केले असून हिमांशू हादेखील एक मोठा अभिनेता आहे.

तीस कोटीची आहे संपत्ती

अमृता खानविलकर हिने आपल्या मेहनतीवर मराठी चित्रपट सृष्टी त नाव कमावले आहे. आजवर तिने अनेक चित्रपटात काम केले असून ती एका शोसाठी किंवा एका चित्रपटासाठी काही लाखांमध्ये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते. अमृता खानविलकर हीची एकूण संपत्ती ही तीस कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येते. तसेच अमृताकडे सध्या अनेक चित्रपट असल्याचेही सांगण्यात येत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *